नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– खूनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने टोळक्याने एका युवकावर कोयत्याने हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खोडेनगर भागात घडली असून यात युवकाने एका इमारतीचे टेरेस गाठल्याने तो बालंबाल बचावला आहे. याप्रकरणी मंबईनाका पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश उर्फ दादया लिलके, बाबा व त्यांचे चार साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत शुभम संतोष मनवर (२० रा.बनकर मळा,पाण्याच्या टाकीजवळ खोडेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. मनवर बुधवारी (दि.२३) सायंकाळी आपल्या घर परिसरात उभा असतांना दुचाकीवर आलेल्या संशयितांनी तुषार चावरे याच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हल्ला केला.
टोळके कोयता घेवून अंगावर धावून आल्याने मनवर याने धुम ठोकली यावेळी संशयितांनी कोयता उगारून सोडू नका याला मारूण टाका असे म्हणत त्याचा पाठलाग केला. मात्र मनगर याने राहत्या इमारतीच्या टेरेस गाठल्याने तो बालंबाल बचावला असून अधिक तपास उपनिरीक्षक मुस्तफा शेख करीत आहेत.