सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा पाठपुरावा…नंदिनी नदीवरील संरक्षक जाळीची अखेर दुरुस्ती

by India Darpan
एप्रिल 24, 2025 | 4:38 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250424 WA0260 e1745492882230

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पूरस्थितीची माहिती देणारे सेन्सॉर बसविण्यासाठी नंदिनी नदीवरील दोंदे पूलावरील संरक्षक जाळी स्मार्ट सिटी कंपनीकडून तोडण्यात आली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर गुरुवारी ही जाळी दुरुस्त करण्यात आली.

नंदिनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर घाण, कचरा, राडारोडा, चिकन, मटण दुकानांमधील घाण टाकून मोठ्या प्रमाणात नंदिनीचे पर्यायाने गोदावरीचे प्रदूषण केले जात होते. ते रोखण्यासाठी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या सततच्या पाठपुराव्यानंतर प्रभाग २४ मधील दोंदे पूल, गोविंदनगर रस्त्यावरील पूल, बाजीरावनगर, डेटामॅटिक्सजवळील पूल या ठिकाणी महापालिकेने संरक्षक जाळ्या बसविल्या. यामुळे घाण, कचरा टाकण्यास प्रतिबंध आला असून, प्रदूषणही कमी झाले आहे. दोंदे पुलावर पूरस्थितीची सूचना देणारे सेन्सॉर बसविण्यासाठी स्मार्ट सिटीने काही दिवसांपूर्वी ही जाळीच तोडून टाकली, ती पुन्हा बसविलीच नाही, यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण व कचरा टाकला जात होता, प्रदूषणही वाढले होते, जीवितहानी होण्याचा धोका वाढला होता. ही जाळी त्वरित दुरुस्त करावी अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महापालिकेला निवेदनाद्वारे शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने २१ एप्रिल रोजी दिला होता.

यानंतर सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी महापालिका व स्मार्ट सिटीकडे पाठपुरावा केला. अखेर गुरुवारी, २४ एप्रिल रोजी ही जाळी स्मार्ट सिटीने दुरुस्त केली. यामुळे घाण, कचरा टाकून प्रदूषण होण्यास प्रतिबंध येणार आहे. बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, यशवंत जाधव, निलेश ठाकूर, विनोद पोळ, सुनील सोनकांबळे, डॉ. शशीकांत मोरे, मनोज वाणी, अशोक पाटील, शैलेश महाजन, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब तिडके, पंढरीनाथ पाटील, सतीश मणिआर, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, सचिन राणे, हरिष काळे आदींसह रहिवाशांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा…२० हजाराचे मॅफेड्रॉन जप्त

Next Post

खूनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने टोळक्याचा युवकावर कोयत्याने हल्ला

Next Post
crime

खूनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने टोळक्याचा युवकावर कोयत्याने हल्ला

ताज्या बातम्या

court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011