बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशकात दिवसभर गारठ्याने हुडहुडी! राज्यातील निच्चाकी तपमानाची नोंद; बघा, पारा कुठे किती अंशांवर?

by India Darpan
नोव्हेंबर 21, 2022 | 11:31 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
cold wave winter e1671450852736

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा कमालीचा घसरला असून नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. राज्यात निफाड तालुक्यातील ओझर सर्वात थंड ठरले असून याठिकाणी ५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या निफाड तालुक्याचे तापमान घसरत होत असल्याने द्राक्ष उत्पादकही धास्तावले आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी नाशिकच्या ओझरमध्ये पडल्याची दिसते. परिणामी कडाक्याच्या थंडीने ओझरकर गारठले आहेत. निफाड तालुक्यातील ओझरमध्ये आज ५ .७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. एचएएलच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये ही नोंद करण्यात आली. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचं हे निचांकी तापमान आहे. तर निफाड तालुक्याचे आजचे किमान तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दरम्यान नाशिक जिल्ह्याचा पारा १० अंश दरम्यान स्थिरावला आहे.

गेल्या आठवड्यात थंडीने जोर धरला. वातावरणातील गारवा वाढला आहे. नाशिककर थंडीचा अनुभव घेत आहेत. दरवर्षी दिवाळीत थंडी सुरु होत असली तरी यावेळी मात्र नोव्हेंबरचा तिसरा आठवडा उजाडल्यानंतर थंडीचे आगमन झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे शनिवारी सकाळी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.निफाडला सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. याठिकाणी तापमानाचा पारा ८.१ अंश सेल्सिअसपर्यँत खाली घसरला होता.

सोमवारी पारा दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता.सायंकाळी सहानंतर तर यात आणखीच वाढ झाली.सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट झाल्याने नाशिकरांना हुडहुडी भरली आहे. आल्हाददायी हवामानाचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, कानटोपी अशा उबदार कपड्यांचा आधार घेतला जात आहे. तर गोदाकाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
दुसरीकडे वाढत्या थंडीचा परिणाम बाजारपेठांवरही दिसून येत आहे.सहानंतर बाहेर रस्त्यांवरील वर्दळ कमी होत असून बाजारपेठांमध्येही शुकशुकाट दिसून येत आहे. निफाड तालुक्यात वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. बागांमध्ये शेकोट्या करून उब निर्माण केली जात आहे. तापमानाचा पारा घसरतच राहिल्यास द्राक्षाला फटका बसू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Nashik Cold Winter Temperature Weather

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केजरीवालांच्या ‘रोड शो’मध्ये मोदी मोदीच्या घोषणा; केजरीवाल म्हणाले…

Next Post

एकाच कुटुंबातील सहा जण आढळले मृतावस्थेत; घातपाताचा संशय

India Darpan

Next Post
crime diary 2

एकाच कुटुंबातील सहा जण आढळले मृतावस्थेत; घातपाताचा संशय

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011