India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

एकाच कुटुंबातील सहा जण आढळले मृतावस्थेत; घातपाताचा संशय

India Darpan by India Darpan
November 21, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एकाच कुटुंबातील सहा जण मृतावस्थेत आढळल्याने राजस्थानमधील गोल गेदी गावात शोककळा पसरली आहे. घरातील एका खोलीतून चार निष्पापांसह दाम्पत्याचे मृतदेह सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आहे. या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

उदयपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. झरोली जवळच गोल नेदी हे गाव आहे. गावकऱ्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. मृत्यूची कारणे अद्याप उघड झालेली नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोगुंडा पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घराचा दरवाजा उघडल्याने पोलिसही अवाक् झाले. घरात तब्बल ६ मृतदेह आढळून आले. सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. पोलिसांनी घर सील केले आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. सध्या या कुटुंबाची ओळख पोलिसांनी उघड केलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी आत्महत्या आणि खुनाच्या दोन्ही बाजूंचा तपास सुरू केला आहे. सहा जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

Crime one family Person Dead Body in Home
Rajasthan Udaipur


Previous Post

नाशकात दिवसभर गारठ्याने हुडहुडी! राज्यातील निच्चाकी तपमानाची नोंद; बघा, पारा कुठे किती अंशांवर?

Next Post

कांद्याच्या भावात मोठी घसरण… संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव पाडले बंद…

Next Post

कांद्याच्या भावात मोठी घसरण... संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव पाडले बंद...

ताज्या बातम्या

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरती; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण

September 29, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group