नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराच्या काही भागात येत्या शुक्रवारी (२२ जुलै) पाणी पुरवठा होणार नाही, तशी माहिती महापालिकेने दिली आहे. नाशिक महापालिकेच्या पाणी पुरवटा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रामधील जलकुंभावर पाईपलाईन जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामाचे स्वरुप मोठे आहे. त्यामुळे त्यास विलंब लागणार आहे . त्यामुळे नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक २० मधील नवले चाळ, विभागीय आयुक्त कार्यालय व प्रभाग क्रमांक १९ ओढा रोड, इत्यादी परिसरात शुक्रवार, दिनांक २२ जुलै रोजीचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच शनिवार २३ जुलै रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. तरी याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन विभागाने केले आहे
Nashik City Water Supply Municipal Corporation