नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील अशोक बिल्डकॉनने गुजरातमध्ये साकारलेल्या ऐतिहासिक पुलाची यशोगाथा आज टीव्हीवर पहायला मिळणार आहे. हिस्ट्री या मालिकेवर आज रात्री साडेसात वाजता ही यशोगाथा दाखविली जाणार आहे. कोरोनाचा कालखंड हा सर्वांसाठीच अतिशय कठीण होता. आणि याच काळात नर्मदा नदीवर अतिशय विक्रमी वेळेत आणि अत्यंत दर्जेदार स्वरुपाचा हा पूल साकारण्यात आला आहे. खरे तर हा आठ पदरी पूल साकारणे हे एक मोठे आव्हान होते. पण ते अशोकाने स्विकारले आणि पूर्ण केले. तब्बल ८२६ कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या या पुलाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. बघा, या पुलाच्या यशोगाथेचा हा व्हिडिओ
Ashoka Buildcon Limited Narmada Bridge Engineering Marvel History Channel