नाशिक – शहरात सुरू असलेल्या वाहनांच्या टोईंग कामकाजावर नाशिक वाहतूक पोलिस अत्यंत खुष आहेत. शहरात पार्किंगची योग्य ठिकाणे नसतानाही वाहने टोईंग केली जात असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शिवाय कंत्राटदार अधिक पैसे मिळत असल्याने केवळ दुचाकी वाहनांनाच लक्ष्य करीत आहे. तीन चाकी असलेल्या रिक्षा कुठेही, केव्हाही आणि कशाही पार्क केलेल्या असल्या तरी कंत्राटदार त्याकडे ढुंकूनही पाहत नाही, अशा वाहनधारकांच्या तक्रारी असल्या तरी नाशिक पोलिसांनी कंत्राटदाराला गिफ्ट दिले आहे. या कंत्राटदाराचे पुढील तीन महिन्यांचे कंत्राट देण्यात आले आहे. म्हणजेच, कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिसांचे आदेश खालीलप्रमाणे