India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गॅस पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यांची दुरावस्था; विद्युत, पाणीपुरवठा विस्कळीत, शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

India Darpan by India Darpan
March 7, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅस पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. केबल तुटल्याने विद्युत पुरवठा सातत्याने खंडीत होत आहे. या समस्या सोडवण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. महापालिका शहर अभियंता नितीन वंजारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

प्रभाग क्र. २४ (नवीन ३०) मध्ये गेल्या काही दिवसांपासून गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदले जात आहेत. यामुळे अनेक ठिकाणी केबल तुटल्याने विद्युत पुरवठा सातत्याने खंडीत होत आहे. पाण्याच्या पाईपलाईन काही ठिकाणी फुटल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे. खोदलेले रस्ते पूर्ण बुजवलेले नाहीत, मातीच्या ढिगार्‍यांमुळे रस्त्यांची आणखी दुरावस्था झाली आहे. स्ट्रीटलाईटही बंद पडले आहेत. कालिका पार्क, जगतापनगर, प्रियंका पार्क आदी भागातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. मातीवर पाणी टाकून रोलरने रस्त्याचे सपाटीकरण करणे आवश्यक आहे. वरील सर्व समस्या सोडविण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा प्रभागात संबंधित ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, संजय टकले, मनोज वाणी, अशोक पाटील, नीलेश ठाकूर, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, दिलीप दिवाणे, बाळासाहेब दिंडे, रमेश देशमुख, शैलेश महाजन, सोमनाथ काळे, पुरुषोत्तम शिरोडे, मीना टकले, वंदना पाटील, सरीता पाटील आदींसह रहिवाशांनी दिला आहे.


Previous Post

भाव न मिळाल्याने शेतक-याने मनमाडमध्ये कोथिंबीर वाटली फुकट (बघा व्हिडिओ)

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता आणि बंता

Next Post

इंडिया दर्पण - हास्य षटकार - संता आणि बंता

ताज्या बातम्या

साक्षी गर्गे बनली आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच; नाशिकला प्रथमच बहुमान

March 28, 2023

मनमाड जवळील लोणच्या डोंगरावर पेटला वणवा; वनविभागाने लावलेली हजारो झाडे जळून खाक

March 28, 2023

EPFOचा मोठा निर्णय; या वर्षी पेन्शनवर मिळणार इतके टक्के व्याज

March 28, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group