नाशिक – हिरवळ व फुलझाडांसह इतर सुशोभिकरण करून गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक नव्याने विकसित करा, आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करा, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या मागणीनुसार गोविंदनगर येथील स्वर्गीय शिवराम वझरे जॉगिंग ट्रॅकची संरक्षक भिंत आणि इतर आवश्यक कामांसाठी सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात महापालिका प्रशासनाने ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, संरक्षक भिंत बांधण्याबरोबरच जॉगिंग ट्रॅकचे रूंदीकरण करावे, दोन्ही कडेला हिरवळ (लॉन) विकसित करावी, वेगवेगळ्या फुलझाडांनी सुशोभिकरण करावे, म्युझिक सिस्टीम, ग्रीन जिम, पॅगोडा, स्वच्छतागृह अशा आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. अशा पद्धतीने हा ट्रॅक विकसित झाला तर त्याचा उपयोग गोविंदनगर, सद्गुरूनगर, बाजीरावनगर, उंटवाडी, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, जगतापनगर, कालिका पार्क, जुने सिडको, बडदेनगरसह शहरवासीयांना होणार आहे.
पथदर्शी म्हणून जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशी मागणी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवलताई खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, यशवंत जाधव, नीलेश ठाकूर, दिलीप दिवाणे, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, गुलाब शिंदे, बापुराव पाटील, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय डोंगरे, भालचंद्र रत्नपारखी, बाळासाहेब देशमुख, अशोक पालवे, सुदाम निकम, उज्ज्वला सोनजे, सुनिता उबाळे, वंदना पाटील, शीतल गवळी, सुलोचना पांडव, अपर्णा खोत, चित्रा रौंदळ, मिनाक्षी पाटील, प्रतिभा पाटील, माया पुजारी, रूपाली मुसळे, मीना टकले, कांचन महाजन, अशोक पाटील, मनोज वाणी, श्रीकांत नाईक, डॉ. शशिकांत मोरे, मंदार सडेकर, शैलेश महाजन, किरण काळे, हरिष काळे, दीपक दुट्टे, नितीन तिडके, बाळासाहेब राऊतराय, वैभव कुलकर्णी, मगन तलवार, तेजस अमृतकर, प्रथमेश पाटील, कुणाल महाजन, बन्सीलाल पाटील आदींसह रहिवाश्यांनी केली आहे.