मधूर गुजराथी
चांदवड – तालुक्यातील काजीसांगवी येथील दिलीप ठकाजी ठाकरे यांचे विहिरीत सकाळी सात वाजता अश्विनी सचिन ठाकरे (२२) ही मृतावस्थेत आढळली. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान या विवाहीत महिलेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्यांनी संशय व्यक्त केला व चांदवड पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालयात सदर मृत विवाहीतेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या विरोधात जोर्पयत हुंडाबळीचा गुन्हा दाखल होत नाही. तोर्पयत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा माहेरच्यांनी पवित्र घेतला होता. गुन्हा दाखल होतो न होतो तोच माहेरच्यांनी काजीसांगवी गाव गाठले व तेथे अंत्यविधी करण्यापुर्वी सासरचे ठाकरे यांचे घर जाळले होते. त्यानंतर या दोन्ही घटनेत गुन्हे दाखल झाले आहे. त्यात आत्महत्या प्रकरणी सात तर घर जाळल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाले आहे. या सर्व १३ जणांना चांदवड न्यायालयात उभे केले असता त्यांना बुधवार पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेत मृत अश्विनीचे वडील रामदास एकनाथ सरोदे ( रा. नांदुरखुर्द ता.निफाड) यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगी अश्विनी हिचा विवाह १५ फेब्रुवारी २०२१ रोजी काजीसांगवी येथील सचिन दिलीप ठाकरे यांच्याशी झाला होता. ते सैन्य दलात कामास असून विवाह झाल्यापासून पती सचिन ठाकरे, सासु जयाबाई ठाकरे हे अश्विनी हिस कार घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी नेहमी त्रस देत होते. दीड महिन्यापुर्वी बॅकेतून तीस हजार रुपये पाठविले तर मेव्हणा परशराम निवृत्ती पवार यांच्याकडून एक लाख रुपये ऊसने घेऊन सासरे दिलीप ठकाजी ठाकरे यांच्याकडे पैसे दिले होते. मात्र बाकीचे पैसे मिळाले नाही म्हणून अश्विनीची नंनद पुनम मनोज गुंजाळ, ज्योती निवृत्ती पगार रा. नाशिक , वर्षा अमोल शिरसाठ मुसळगाव ता. सिन्नर, मामे सासरे बाबुराव रेवजी शिंदे रा. रामपुर नैताळे ता. निफाड , व पती सचिन दिलीप ठाकरे, सासरे दिलीप ठकाजी ठाकरे, सासू जयाबाई ठाकरे आदि त्रास देत असल्याने अश्विनीने विहीरीत आत्महत्या केली. या फिर्यादीवरुन चांदवड पोलीस स्टेशनमध्ये सात जणाविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
या घटनेत दुसरी फिर्याद घर जाळल्याप्रकरणी भूषण गंगाधर ठाकरे यांनी दिली. या फिर्यादीवरुन परशराम निवृत्ती पवार रा. रामपुर नैताळे, दीपक निवृत्ती भालसिंग बुरकुलवाडी मनमाड, लहानु शिवराम झाल्टे रा.वाघदर्डी,संदीप निवृत्ती भालसिंग रा. भुईसर जि. पालघर, चेतन लहानु झाल्टे, वाघदर्डी, व एक दाढीवाला इसम त्याचे बुलेटवर आर्मी नाव लिहलेले नाव गाव माहित नाही असे माहेरचे सहा जणाविरोधात चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.