नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बहिण भावासह त्यांच्या दोन साथीदारांनी एका महिलेस बेदम मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चार जणांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलिस ठाणे हद्दीत राहणा-या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित बहिण भावासह त्यांच्या दोन अनोळखी साथिदारांनी रविवारी (दि.१४) पीडितेस गाठून वाद घातला. यावेळी संशयित टोळक्यासह भावाने पिडीतेस शिवीगाळ करीत मारहाण केली. तर भावाने दमदाटी करीत तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक अतुल पाटील करीत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून संशयिताचा शोध घेतला जात आहे.
जुने नाशिक भागात राहणा-या १७ वर्षीय पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयिताने पीडितेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिला वेगवेगळय़ा भागात घेवून जात संशयिताने बलात्कार केला. मुलीने ४ ते ८ मे दरम्यान लग्नाचा तगादा लावला असता त्याने नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अभिजीत सोनवणे करीत आहेत.