नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुक्तिधाम परिसरात रस्त्याने पायी जाणा-या महिलेची वाट अडवित एकाने शिवीगाळ व मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन देविदास वाळूंज (रा.प्रगती अपा.बनकर मळा,चेहडी पंपीग) असे संशयिताचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या वर्षी १६ ऑगष्ट रोजी रात्री महिला मुक्तीधाम मंदिरासमोरून पायी जात असतांना संशयिताने तिची वाट अडविली. यावेळी पूर्ववैमनस्यातून संशयिताने शिवीगाळ व मारहाण करीत महिलेचा नियभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.
नाशिकरोडच्या हॉस्पिटलमध्ये महिलेशी अश्लिल वर्तन
नाशिकरोड येथील सुजाता बिर्ला हॉस्पिटल येथे आजारी रूग्णाच्या देखभालीसाठी थांबलेल्या महिलेचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली. कैलास बाळू संसारे (३८ रा.पळसे ता.जि.नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. याप्रक्रणी उपनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचे नातेवाईक आजारी असल्याने त्यास सुजाता बिर्ला हॉस्पिटल येथील जनरल वार्डात दाखल करण्यात आले आहे. महिला आजारी रूग्णाची देखभाल करण्यासाठी रूग्णालयात थांबली असता ही घटना घडली. बुधवारी (दि.१०) पीडिता रूग्णाच्या खाटे शेजारील कॉटवर झोपलेली असतांना संशयिताने तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे करीत आहेत.