India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विदेशातील सहलीसाठी ८० हजार भरले.. ४ महिन्यांनंतरही तिकीटे मिळाली नाही… अशी झाली फसवणूक

India Darpan by India Darpan
May 11, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सवलतीच्या दरात विदेशातील सहलीचे नियोजन करण्यात आल्याची बतावणी करत एकाने ८० हजाराची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. थायलंड हॉलीडे पॅकेजचे आमिष दाखवित भामट्याने हा गंडा घातला आहे. सवलती ही रक्कम ऑनलाईन बँक खात्यात भरल्यानंतर मुदतीत पॅकेजचे तिकीट प्राप्त न झाल्याने ग्राहकाने पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित शर्मा असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. सुशिल राजाराम सोनवणे (५७ रा.गोविंदनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयिताच्या वतीने सवलतीच्या दरात विदेशातील सहल अशी जाहिरात करण्यात आल्याने सोनवणे यांनी त्याच्याशी संपर्क केला असता ही घटना घडली. सोनवणे यांना उन्हाळी सुट्टीनिमित्त विदेशात जायचे असल्याने त्यांनी संबंधिताशी संपर्क साधला असता थायलंड टूर निश्चित करण्यात आला होता. संशयिताने थायलंड हॉलिडे पॅकेजचे स्वस्तातील आमिष दाखविल्याने ८० हजाराचा खर्च ठरला होता.

त्यानुसार १ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान सोनवणे यांना संबधीताने स्वतःच्या फेडरल बँक खात्यात ऑनलाईन पैसे भरण्यास भाग पाडले. चार महिने उलटूनही संबधीताने पॅकेजचे तिकीट न पाठविल्याने तसेच संपर्क तोडल्याने सोनवणे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.


Previous Post

मुक्तीधाम येथे पादचारी महिलेचा विनयभंग तर नाशिकरोडच्या हॉस्पिटलमध्ये महिलेशी अश्लिल वर्तन

Next Post

नाशिक शहरात पोलिस पतीसह तिघांची आत्महत्या

Next Post

नाशिक शहरात पोलिस पतीसह तिघांची आत्महत्या

ताज्या बातम्या

अहोभाग्य! तब्बल ५८ पुणेकरांना मिळाला चोरीचा मुद्देमाल; पोलिसांच्या तपासाचे फलित

June 5, 2023

आंदोलक कुस्तीपटूंनी मध्यरात्री घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; काय निर्णय घेणार?

June 5, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group