India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकातून आणखी दोन दुचाकी चोरीला; जेलरोडला प्रौढाची आत्महत्या, आधी ब्लेडने वार, नंतर गळफास

India Darpan by India Darpan
May 12, 2023
in क्राईम डायरी
0
crime

crime


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराच्या वेगवेगळ्या भागातून नुकत्याच दोन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना अंबड लिंकरोडवरील चुंचाळे शिवारात घडली. दिलीपसिंग शिवशंकर सिंग (रा.घरकुल योजना चुंचाळे) यांची शाईन मोटारसायकल एमएच १५ जीजी ६८०१ बुधवारी (दि.१०) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक सावळे करीत आहेत.

दुसरी घटना पंचवटी भाजी मार्केट येथे घडली. तारवालानगर भागात राहणारे नरेश ईश्वर गायकवाड (रा.सप्तशृंगी नगर) हे गेल्या सोमवारी (दि.८) पंचवटी भाजी मार्केट यार्ड भागात गेले होते. हॉटेल साई प्रसाद समोर त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ एव्ही ७८६० पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.

दोन्ही हातांवर ब्लेडने वार करीत गळफास घेऊन आत्महत्या
जेलरोड परिसरातील लोखंडे मळा भागात दोन्ही हातांवर ब्लेडने वार करीत एकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. अजय मधूकर नागरे (५४ रा.रघूनंदन हौ.सोसा.सप्तशृंगीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नागरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागरे यांनी गुरूवारी (दि.११) दुपारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात दोन्ही हातावर ब्लेडने वार करून घेतला होता. त्यापाठोपाठ पंख्यास ओढणी बांधून गळाफास लावून घेतला ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.


Previous Post

कुत्रा आडवा आल्याने दुचाकीला अपघात, पपया नर्सरी येथे तरुण ठार; कॅनडा कॉर्नरवर सलूनमध्ये महिलेला मारहाण

Next Post

कोर्टाच्या आदेशानंतर शिंदे सरकार लागले कामाला.. उद्यापासून या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ

Next Post

कोर्टाच्या आदेशानंतर शिंदे सरकार लागले कामाला.. उद्यापासून या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

मंदिराच्या आवारात घेतला किस; ‘आदिपुरुष’फेम क्रिती सेनॉन आणि ओम राऊत ट्रोल

June 9, 2023
प्रातिनिधीक फोटो

विद्यार्थ्यांनो, इकडे लक्ष द्या! MHT CET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

June 9, 2023
सुनिता धनगर

अखेर शिक्षण विभागाला जाग लाचखोर सुनीता धनगर हिच्यावर केली ही कारवाई

June 9, 2023

ना मंत्री, ना लवाजमा.. अत्यंत साध्या पद्धतीने लग्न… अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कन्येचा विवाह… हा आहे त्यांचा जावई

June 9, 2023

‘हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेने मागितली माफी… हे आहे प्रकरण

June 9, 2023

उर्फी जावेद करणार या आजोबांचा महिन्याचा खर्च; कोण आहेत ते?

June 9, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group