मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शिवाजीनगरला तरूणाची आत्महत्या तर नाशिकरोडला कामगारावर हल्ला

by India Darpan
जून 22, 2023 | 5:19 pm
in क्राईम डायरी
0
sucide 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २९ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. चिंतामण काळू राऊतमाळे (रा.मामाची गिरणी समोर,कृष्ण मंदिराजवळ कार्बननाका) असे मृत युवकाचे नाव आहे. चिंतामनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राऊतमाळे यांनी बुधवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये अज्ञात कारणातून लोखंडी अ‍ॅगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पत्नी योगिता राऊतमाळे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.

चोरीच्या संशयातून कामगारावर हल्ला
नाशिक पुणे मार्गावरील दत्तमंदिर सिग्नल भागात मोबाईल चोरीच्या संशयातून हातगाडीवर झोपलेल्या इसमाच्या डोक्यात एकाने सिमेंटचा गट्टू मारल्याची घटना घडली. याघटनेत सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामभाऊ शामराव वरखेडे (४७ रा.मुकूंद अपा.बालाजी मंदिरा शेजारी,शिखरेवाडी) असे गट्टू मारणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सरला घुगे (रा.प्रकाश आंबेडकर नगर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

घुगे यांचे पती अनिल यादव घुगे (४९) हे बुधवारी (दि.२१) नेहमीप्रमाणे दत्तमंदिर सिग्नल भागात कामावर गेले होते. सायंकाळच्या सुमारास पटेल वाईन्स समोर ते आपल्या हातगाडीवर झोपलेले असतांना ही घटना घडली. संशयित वरखेडा याचा हरविलेला मोबाईल घुगे यांच्याकडे असल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आला. संतप्त वरखेडे याने घुगे झोपी गेल्याची संधी साधत बाजूला पडलेला सिमेंटचा वजनी गट्टू त्यांच्या डोक्यात मारला. या घटनेत घुगे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरातून दोन मोपेड गाड्या चोरीला

Next Post

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत शिक्षण विभागाने काढले हे आदेश

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक छायाचित्र

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत शिक्षण विभागाने काढले हे आदेश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011