नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन दिवसात बेकायदा दारु विक्री करणा-यावर छापा टाकत पोलिसांनी पाच विक्रेत्यांवर कारवाई करीत देशी – विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी अंबड, पंचवटी, सातपूर, गंगापूर आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंबड औद्योगीक वसाहतीतील गौतमनगर भागात राहणारा प्रल्हाद अंकुश डोंगरे (३६) हा बुधवारी रात्री परिसरातील मारूती शोरूम भिंती लगत बेकयदा दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यात प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूच्या बाटल्यांचे सुमारे ८०४ रूपये किमतीचे बॉक्स पोलिसांनी जप्त केले असून याप्रकरणी पोलिस शिपाई सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत. दुसरी कारवाई पेठरोड भागात करण्यात आली. शिवाजी बाबुराव जाधव (६१ रा.लक्ष्मणनगर,पेठरोड) हा विक्रेता बुधवारी रात्री गल्ली नं.३ मध्ये दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या घरात सुमारे २ हजार १०० रूपये किमतीचा दारू साठा मिळून आला असून पोलिस शिपाई अविनाश थेटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस नाईक नांदुर्डीकर करीत आहेत. तिसरी कारवाई प्रबुध्दनगर भागात करण्यात आली. अनिल नारायण घुगे (रा.महालक्ष्मी चौक.प्रबुध्दनगर सातपूर) हा बुधवारी रात्री मद्यविक्री करतांना आढळून आला त्याच्या ताब्यातून सुमारे ७७० किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून अंमलदार गोकूळ कासार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत. चौथी कारवाई संतकबीरनगर भागात करण्यात आली. बंडू गंगाराम पारवे (५० रा.समाजमंदिराजवळ भोसला मिलटरी स्कूल मागे संतकबीरनगर) हा भोसला स्कूलच्या भिंतीलगत दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातील सुमारे १ हजार ३६५ रूपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अंमलदार सोनू खाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक गवे करीत आहेत. तर श्याम संतोष गुप्ता (३३ रा.काठेगल्ली,द्वारका) हा गुरूवारी सायंकाळच्या सुमारास तपोवन लिंकरोडवरील संगम स्विट दुकान परिसरात मद्यविक्री करतांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे २ हजार ३४५ रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. अंमलदार हसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपा पोलिस नाईक ठेपणे करीत आहेत.