India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कोयता गँग पोलिसांच्या रडारवर; दहशत माजविणा-या तिघांवर पोलिसांची कारवाई

India Darpan by India Darpan
February 10, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोयता गँगला पोलिसांनी आपल्या रडारवर घेतले असून गुरूवारी वेगवेगळया भागात दहशत माजविणा-या तिघांवर पोलिसांनी कारवाई करुन त्यांच्या ताब्यातून धारदार कोयते जप्त केले आहेत. याप्रकरणी आडगाव व नाशिकरोड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
औद्योगीक वसाहतीतील रियाबल कंपनी भागात एक तरूण धारदार शस्त्र घेवून फिरत असल्याच्या माहिती वरून अंबड पोलिसांनी धाव घेत अशपाक रफिक पठाण (२२ रा.रियाबल कंपनी पाठीमागे,बजरंगवाडी) या संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात कोयता मिळून आला. संशयितास अटक करीत कोयता जप्त करण्यात आला असून पोलिस शिपाई राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक आवारे करीत आहेत. दुसरे प्रकार नाशिकरोड भागात समोर आले. मालधक्कारोडवरील मातोश्री रमाई आंबेडकर नगर भागात एक सराईत गुन्हेगार हातात शस्त्र घेवून नागरीकांना शिवीगाळ करीत दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाव घेत श्याम गोविंद कसबे या पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या असता त्यांच्या अंगझडतीत लोखंडी कोयता मिळून आला. याबाबत पोलिस शिपाई राकेश बोडके यांनी तक्रार दाखल केली आहे. तर कृष्णा संजय थोरात (१९ रा.म्हाडा बिल्डींग,अश्विनी कॉलनी,सामनगावरोड) हा युवक जयप्रकाश नगर येथील पाटालगत दहशत माजवितांना मिळून आला. त्याच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला असून याप्रकरणी पोलिस शिपाई धकाते यांनी तक्रार दिली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार काकड व पोलिस नाईक घेगडमल करीत आहेत.


Previous Post

बेकायदा दारु विक्री करणा-या पाच विक्रेत्यांवर कारवाई; देशी – विदेशी मद्याचा साठा जप्त

Next Post

अररर….! मुख्यमंत्र्यांनी वाचलं चक्क गेल्या वर्षाचं बजेट; असं झालं उघड (Video)

Next Post

अररर....! मुख्यमंत्र्यांनी वाचलं चक्क गेल्या वर्षाचं बजेट; असं झालं उघड (Video)

ताज्या बातम्या

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने सुरू केली व्हॉटस्अ‍ॅप बँकिंग सेवा; असा होणार ग्राहकांना फायदा

April 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group