नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागात राहणा-या दोन महिलांचा विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना वडाळागावात घडली. तडिपार गुंडाने आपल्या घरातील महिलांना सोबत घेत शेजारी महिलेच्या घरात घुसून तिला लाकडी दांडक्याने मारहाण करीत विनयभंग केला. किरकोळ भांडणाची पोलिसात तक्रार दाखल केल्याने ही घटना घडली. पीडितेशी तडिपार वसीम उर्फ चिया लतिफ शहा (२५) याच्या कुटुंबियांचा बुधवारी रात्री वाद झाला होता. याबाबत महिलेने पोलिसात तक्रार दिल्याने गुरूवारी संशयितासह त्याची भावजई शाहिन मोहसीन शहा व बहिण सना मर्द मोईन शहा या तिघांनी महिलेचे घर गाठून मायलेकींना लाकडी दांडक्याने मारहाण करीत संशयिताने महिलेचा विनयभंग केला. यावेळी पीडितेसह तिच्या मुलीच्या बचावासाठी धावून आलेले शेजारी सत्यभामा देवरे, रवी खोडे, प्रकाश बेडकुळे आदींनाही संशयिताने शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.दुसरी घटना अशोका मार्ग भागात घडली. येथे राहणारी ३४ वर्षीय महिला गुरूवारी कल्पतरूनगर भागातून आपल्या घराकडे रस्त्याने पायी जात असतांना इलेक्ट्रीक मोपेडवर पाठीमागून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने तिचा विनयभंग केला. ही घटना साईबाबा मंदिरासमोर घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.