नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बजरंगवाडी भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास केला. या चोरीप्रकरणी रूपा रमेश राऊत (७१ रा.आकांक्षा बंगला,हॅपी होम कॉलनी,तुलसी आय हॉस्पिटल जवळ) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत कुटुंबिय गेल्या मंगळवारी (दि.७) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्याचा कडीकोयंडा कश्याने तरी तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे लॉकेट व पाच हजाराची रोकड तसेच देवघरातील देवदेवतांच्या चांदीच्या मुर्त्या, मनगटी घड्याळ डिव्हीआर असा सुमारे १ लाख ८९ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.