नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील शिवाजी चौक भागात हात उसनवार दिलेल्या पैश्यांची मागणी केल्याने तिघांनी एकास मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत जखमी दिराच्या मदतीला धावून गेलेल्या भावजयीचा संशयितांपैकी एकाने विनयभंग केला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश चौव्हाण,सागर चव्हाण व नितीन चव्हाण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पीडितेच्या दिराने गणेश चौव्हाण या संशयितास हातऊसनवार पैसे दिले होते. शनिवारी (दि.४) रात्री दिर भावजयी पैसे मागण्यासाठी गेले असता ही घटना घडली. शिवाजी बस स्टॉप भागात संशयितास गाठून दिराने त्याच्याकडे पैश्यांची मागणी केली असता. त्रिकुटाने शिवीगाळ करीत त्यास लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण केली. यावेळी दिराच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न करणा-या नितीन चव्हाण यास महिलेने रोखले असता संशयिताने तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक उत्तम सोनवणे करीत आहेत.