मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस चक्क नौपाडा पोलिस ठाण्यात साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त पोलिसांना गणवेश वाटपही करण्यात आले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. यापुढे सर्वच आमदार आणि खासदार या लोकप्रतिनिधींचे वाढदिवस पोलिस ठाण्यात साजरे करण्याची मुभा सरकारने द्यावी. तशी मागणी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. परांजपे यांनी म्हटले आहे की, खरंतर गणवेश वाटप हे गृह विभागतर्फे केले जाते. पण मुख्यमंत्र्यांचे स्वतःला सुपर सीएम समजणारे चिरंजीव हे असे विशेष कृत्य गृहखात्याच्या परवानगीने करत आहेत की गृहखाते व गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून याचा खुलासा आता व्हायला हवा, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे पुत्र खा. @DrSEShinde यांचा वाढदिवस नौपाडा पोलिस ठाण्यात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गणवेश वाटपही करण्यात आले. @Dev_Fadnavis pic.twitter.com/bRvKluyqAY
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 6, 2023
कोणत्याही परिस्थितीत अगदी चोखपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांच्या याच कर्तव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला काल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युवासेनेच्या वतीने नौपाडा येथील पोलीस बांधवांना गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले pic.twitter.com/9A6duz8GOe
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) February 4, 2023
CM Son Shrikant Shinde Birthday Celebration in Police Station