नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बोरगड भागात रस्त्याने पायी जाणा-या वयोवृध्द महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. उल्का प्रकाश आवटे (६७ रा.पुष्पकनगर,बोरगड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आवटे रविवारी (दि.५) रात्री आठ वाजेच्या सुमारास परिसरातून फेरफटका मारत असतांना ही घटना घडली. पुष्पकनगर मार्गावरून त्या रस्त्याने पायी जात असतांना वैद्य बंगल्यासमोर समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ््यातील सुमारे ६० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.