नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तपोवननगर भागात भरदिवसा बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी टिव्ही लंपास केला. याप्रकरणी सागर मधुकर गोमासे (रा.बळी मंदिराजवळ हनुमाननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोमासे यांचे तपोवनरोडवरील श्रीकृष्ण बर्फाचा कारखाना भागातील विश्वगिरी अपार्टमेंटमध्ये जुने घर आहे. रविवारी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून सोनी कंपनीचा एलसीडी टिव्ही चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक केदार करीत आहेत.