गुटख्याची वाहतूक करणा-या दुचाकीवरील दोघांना पोलिसांनी केले गजाआड; २० हजार रूपयाचा गुटखा जप्त
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील महाराणा प्रताप चौकात गुटख्याची वाहतूक करणा-या दुचाकीवरील दोघांना पोलिसांनी गजाआड करुन त्यांच्याकडून २० हजार रूपयाचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल सुभाष कोठावदे (रा.घनश्याम पार्क,महाले फार्म पाठीमागे) व ज्ञानदिप चिंचोले (रा.पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी अरूण गाडेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. सिडकोत मोठ्या प्रमाणात बेकायदा गुटख्याची खरेदी विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पोलिस यंत्रणा कामाला लागली असून सर्वत्र छापेमारी सुरू आहे. यापार्श्वभूमिवर सोमवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास पोलिस गुटखा तस्करांवर लक्ष ठेवून असतांनाच संशयित अॅक्टीव्हा एमएच १५ जीयू २७४७ वर गुटख्याची वाहतूक करतांना मिळून आले. दोघे डबलसीट प्रवास करीत असतांना पोलिसांनी तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातील प्लॅस्टीक गोणीत गुटख्याची पाकिटे मिळून आली. संशयितांच्या ताब्यातून सुमारे १८ हजार ६२९ रूपये किमतीचा विविध कंपनीचा गुटखा जप्त करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खतेले करीत आहेत.
गोदावरी किनारी असलेल्या बाभूळबनात एकाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोमवारी गोदावरी किनारी असलेल्या बाभूळबनात एकाने आत्महत्या केली. मृताच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. लक्ष्मण श्रावण गोतरणे (४५ रा.रामवाडी शितळादेवी मंदिरा समोर) असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोतरणे यांनी अज्ञात कारणातून सोमवारी दुपारच्या सुमारास बाभूळबनातील एका झाडास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत खंडू गोतरणे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.