नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-यावर पोलिसांनी करत त्यांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. हे जुगारी टाईम बाजार नावाचा मटका जुगार खेळत होते. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावसाहेब शिवाजी कांबळे (रा.सिडको),सोकाजी रावजी काळबांडे (रा.समाज मंदिराजवळ,पाथर्डी गाव),वसंत फकिरा तारू (रा.चर्चच्या पाठीमागे बेथलेनगर),देविदास बुधा ठणके,शिवाजी पर्वत सोमासे (रा. दोघे श्रमिकनगर,सातपूर) व भास्कर मारूती पडघणे (रा.पांगरी मळा,शिवाजी चौक) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित जुगारीची नावे आहेत. संशयित उंटवाडी परिसरातील तिडके मळयाकडे जाणा-या मार्गावरील आमराईत जुगार खेळत होते. युनिट १ चे कर्मचारी वसंत पटाईत यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. उंटवाडी भागातील आमराईत काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.३०) पोलिसांनी छापा टाकला असता संशयित अंक अकड्यावर पैसे लावून मटका जुगार खेळतांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून १ हजार ७२० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.