नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात वाटणी मागितली म्हणून विवाहितेला धमकी देत तिचा मानसिक छळ केला त्यामुळे विवाहितेने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली. या घटनेनंतर मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने संशयित आरोपी अभिजीत राजेंद्र बेलगावकर (३८, पती), भारती राजेंद्र बेलगावकर (५७, सासू), आकाश राजेंद्र बेलगावकर (४०, जेठ), मेघा आकाश बेलगावकर (३०, जेठानी), अमित राजेंद्र बेलगावकर (३६, दिर) या पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, हिरावाडी परिसरातील चिंतामणी नगर प्रथमेश सोसायटी येथे राहणाऱ्या कोमल अभिजीत बेलगावकर (२८) यांनी शुक्रवार सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. त्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती. मयत विवाहिता कोमल हिने मेनरोड येथील घरात वाटणी मागितली असता संशयितांनी नकार दिला. तसेच, घराच्या मालकी हक्कात मुलगा निलराज याचे नाव लावा असे सांगितले. मात्र संशयतांनी तिला वारंवार धमकी देत मानसिक त्रास दिला.