नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हातात धारदार कोयता घेवून दहशत माजविणा-याला पोलिसांनी गजाआड करुन त्याच्या ताब्यातून कोयता हस्तगत करण्यात केला आहे. शाहिद शौकत सय्यद (१९ रा.शेख मंजील,सत्कार पॉईंट ना.रोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील गॅरेज मागील पत्र्याच्या कंपाऊड भागात रविवारी (दि.२९) एक तरूण हातात कोयता घेवून दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नाशिकरोड पोलिसांनी धाव घेतली असता संशयित आरडाओरड करून लोकांना कोयत्याचा धाक दाखवितांना मिळून आला. त्याच्या ताब्यातील कोयता हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक गावले करीत आहेत.