नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोसह औद्योगीक वसाहत भागात राहणा-या दोन जणांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळय़ा मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.पहिली घटना जुने सिडकोत घडली. सुधाकर हिरामण आहिरे (३२ रा.महादेव मंदिराशेजारी इंदिरागांधी वसाहती जवळ) यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील छताच्या लाकडी वास्याला कापडी उपरणे बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शामराव जाधव यांनी खबर दिली आहे. दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील दत्तनगर भागात घडली. येथे राहणा-या विनोद लहानाप्पा थेटे (२८ रा.शिवशक्ती अपा.माऊली चौक) या युवकाने रविवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून सिलींग फॅनला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याबाबत सुनिल थेटे यांनी खबर दिली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर व शिरवले करीत आहेत.