India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक शहरात बेकायदा मद्यविक्री सुरूच; पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई

India Darpan by India Darpan
January 21, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळय़ा भागात बेकायदा मद्यविक्री करणा-या दोघा मद्यविक्रेत्यांवर कारवाई करुन साडे पाच हजार रूपये किमतीचा देशी विदेशी दारूचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी उपनगर आणि अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई अंबड लिंकरोडवरील संजीवनगर येथील म्हाडा कॉर्नर भागात करण्यात आली. विशाल राजेंद्र पाटील (३१ रा.गौरव निवास,स्वामी समर्थ केंद्राजवळ,श्रमिकनगर) हा युवक इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर मद्यविक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातील पांढ-या गोणीमध्ये प्रिन्स संत्रा नावाचा ९८० रूपये किमतीचा देशी दारूचा साठा मिळून आला. याप्रकरणी पोलिस शिपाई मुकेश गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत.

दुसरी कारवाई वडनेरगेट भागात करण्यात आली. येथे एक दुचाकीस्वार बेकायदा मद्यविक्री करीत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पथकाने सापळा लावला असता सोमनाथ बजरंग अभंग (४३ रा.वडनेर दुमाला) हा संशयित शिवाजी पुतळय़ा जवळ पोरजे वस्तीकडे जाणा-या मार्गावर एमएच १५ एफबी ३६१५ या मोपेडवर मद्यविक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या दुचाकीच्या डिक्कीतील पिशवीत सुमारे ४ हजार ४२० रूपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा मिळून आला असून याप्रकरणी युनिट २ चे कर्मचारी गुलाब सोनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.


Previous Post

शेअर बाजारातील मोठे अपडेट! २७ जानेवारीपासून मिळणार ही सुविधा, ट्रेडिंग करणाऱ्यांचा फायदाच फायदा

Next Post

चुंचाळेत १७ वर्षीय तरूणीची आत्महत्या; किचनमध्ये घेतला गळफास

Next Post

चुंचाळेत १७ वर्षीय तरूणीची आत्महत्या; किचनमध्ये घेतला गळफास

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group