नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १७ वर्षीय तरूणीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात घडली. धनश्री शत्रुघ्न महाजन (रा.भोर टाऊनशिप) असे मृत युवतीचे नाव आहे. धनश्रीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धनश्री महाजन हिने शुक्रवारी (दि.२०) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचन मध्ये छताच्या हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत.