नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघा तरूणांनी सोमवारी आत्महत्या केली. पहिली घटना सिडकोतील सावतानगर भागात घडली. गौतम संजय बच्छाव (२३ रा.महालक्ष्मीचौक) या तरूणाने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहते घराच्या तिस-या मजल्यावर पत्र्यांच्या अॅगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. आई कल्पना बच्छाव यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.
दुसरी घटना देवळालीगाव येथे झाली. येथील अनिकेत रमेश खरे (२३ रा.मते किराणा दुकानाजवळ,रोकडोबावाडी) या युवकाने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या पत्र्याच्या शेडमध्ये छताच्या बांबूला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस नाईक शेख करीत आहेत.