India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये ९ कोटीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु; निमाच्या प्रयत्नांना यश

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in स्थानिक बातम्या
0

 

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भात निमाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा एमआयडीसीच्या मुख्य अधिकाऱ्यासोबतच स्थानिक अधिकाऱ्यांसोबत सुरु होता. मुख्य रस्त्याच्या व अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जवळपास ९ कोटीचा निधी निमाच्या पदाधिकाऱ्यांनी ३ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असून प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली आहे, यामध्ये मुख्य रस्त्यासोबतच वसाहतीतील अंतर्गत रस्त्याचा समावेश आहे.

औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नेहमीच पुढाकार घेऊन उद्योगांच्या समस्यांचे निरसन करण्याच्या दृष्टीने निमाने आजपर्यंत उल्लेखनिय काम केले आहे. भविष्यात सिन्नर औद्योगिक क्षेत्राला अनन्य साधारण महत्व येणार असल्याने उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने अधिकाधिक कामे कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रयत्न निमाच्या माध्यमातून करण्यात येईल असे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले.

सिन्नर औद्योगिक वसाहतीत १००० ते १२०० उद्योग आहेत, जवळपास १५ ते २० हजार उद्योजक, कर्मचारी व कामगार वर्ग या रस्त्यावरून प्रवास करत असतात त्याच बरोबर अनेक मोठे कंटेनर्स व ट्रक्सची रहदारी या रस्त्यावरून असल्यामुळे मुख्य रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम होणे तितकेच महत्वाचे होते. मुख्य रस्त्यासाठी निमाच्या माध्यमातून नियमित अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्यासमवेत पाठपुरावा केल्यानंतर मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणासाठी व वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी जवळपास ९ कोटींचा निधी मंजूर होऊन प्रत्यक्षात कामास सुरु झाल्यामुळे सिन्नर औद्योगिक वसाहतीतील उद्योजक समाधान व्यक्त करत आहे. यावेळी निमाच्या पदाधिकाऱ्यांनी ट्रक्स टर्मिनल, अंतर्गत ड्रेनेज सिस्टिम, मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण व इतर पायभूत समस्यांबाबत लवकरच एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले.

यावेळी सिन्नर उपसमितीचे अध्यक्ष संदीप भदाणे, माजी अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, सिन्नर उपसामीचे उपाध्यक्ष सुरेंद्र मिश्रा, निमा हाऊस उपसमितेचे अध्यक्ष राजेंद्र वडनेरे, एस के नायर, किरण वाजे, अरुण चव्हाणके, प्रवीण वाबळे,अजय बाहेती, राहुल नवले, अतुल अग्रवाल, दत्ता ढोबळे, बाबासाहेब हारदे, कृष्णा नाईकवाडी, रतन पडवळ, दत्तात्रय नवले, निलेश काकड, मुकेश देशमुख, शिवाजी आव्हाड, विश्वजीत निकम, उपअभियंता, एमआयडीसी सुधीर चावरकर, सहायक अभियंता मळेकर आदी उद्योजक व अधिकारी उपस्थित होते.


Previous Post

नाशकात आत्महत्येचे सत्र सुरूच; दोन तरुणांनी घेतला गळफास

Next Post

नाशिकला मोठे गिफ्ट! गांधीनगर मुद्रणालयाचे आधुनिकीकरण; कामगारांची संख्या १२० वरून थेट इतकी होणार

Next Post

नाशिकला मोठे गिफ्ट! गांधीनगर मुद्रणालयाचे आधुनिकीकरण; कामगारांची संख्या १२० वरून थेट इतकी होणार

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group