नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या दहीपुलावर प्राणघातक हल्ल्याची ही घटना घडली असून एक २१ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत हल्लेखोरांनी परिसरातील चार ते पाच दुकानांची तोडफोड केली आहे. या हल्यामागील कारण मात्र अजून समोर आले नाही. शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या भागांमध्ये झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. घटनेनंतर नागरिकांची तारांबळ उडाली.









