मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी पालकमंत्री दादा भुसे यांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलनासाठी दाखल झाले आहेत. येथील कॉलेज ग्राऊंड मैदानावर आंदोलन सुरू झाले आहे. नाशिक जिल्हा बँकेकडून होत असलेल्या सक्तीच्या वसुली विरोधात हा एल्गार शेतकऱ्यांनी पुकारला आहे. मालेगावात दाखल होताच शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत असली तरी त्यावर दरोडे टाकणारे दरोरडेखोर वेगळे आहे. पण, फासावर आज शेतक-यांना चढवले जात असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माजी संचालकांचा समाचार घेतला. नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून सक्तीची वसूली मोहीम सुरू आहे. यामध्ये मात्र काही थकबाकीदारांना वगळून जिल्हा बँकेने गरीब शेतकऱ्यांनाच वेठीस धरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या या कारवाईस विरोध दर्शविला आहे. तसेच काही कर्जदार शेतकऱ्यांचे खासगी वाहने देखील जिल्हा बँकेने जप्त करण्यात सुरू केली आहे.
बँकेच्या या मनमानी विरोधात स्वाभिमानी शेतकऱ्यांनी संघटनेने पालकमंत्र्यांच्या घरासमोर बिऱ्हाड मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर आजपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे पालकमंत्री यांच्या घरासमोर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. घराकडे जाणा-या रस्त्यावरही बॅरिकेटस लावले आहे. दरम्यान स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी मालेगावमध्ये पोहचले असून त्यांनी चौफुलीवरुन थेट मोर्चा काढत घराकडे कुच केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Malegaon Farmers Agitation GM Bhuse House Raju Shetti Says