नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपळगाव बहुला जवळ असलेल्या तिरडशेत येथे राहत्या घरात पाय घसरून पडल्याने ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. लहानू धर्मा खमके (रा.तिरडशेत,पिंपळगाव बहुला जवळ) असे मृत वृध्दाचे नाव आहे. खमके यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरु असतांनाच त्यांचा मृत्यू झलाा. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पाय घसरून खमके पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास व पायास दुखापत झाल्याने मुलगा कैलास खमके यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.