नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील स्टेट बँक समोरील उड्डाणपुलावर भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अनोळखी पादचारी पुरूष ठार झाला. हा .याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अंबड पोलिस ठाण्याचे शिपाई गजानन पवार यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राणे नगरकडून मुंबईनाक्याकडे उड्डाणपूलावरून जाणा-या अनोळखी पुरूषास मुंबईकडून भरधाव जाणा-या अज्ञात चारचाकीने धडक दिली. या अपघातात सदर पादचारीस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून,अज्ञात चालकाचा पोलिस शोध घेत आहेत. अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.