नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळा पाथर्डी मार्गावरील खोडे लॉन्स येथे चोरट्यांनी वधू पक्षाच्या रूममध्ये ठेवलेली पर्स लंपास केली. यापर्समध्ये रोकडसह दागिणे असा सुमारे सव्वा लाख रूपयांचा ऐवज होती. वधूची आई पर्स ठेवून जेवणासाठी रूमबाहेर पडली असता ही घटना घडली. शाहिन निजामुद्दीन मनियार (रा.वाडिव-हे ता.इगतपुरी ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनियार यांच्या मुलीचा विवाह शनिवारी (दि.३१)खोडे लॉन्स येथे पार पडला. दुपारच्या सुमारास मनियार या वधू पक्षाच्या रूममध्ये पैसे व दागिणे असलेली पर्स सुरक्षीत ठेवून जेवणासाठी रूम बाहेर पडली असता ही घटना घडली. पर्स मध्ये ६० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे एक लाख १७ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार म्हैसधुने करीत आहेत.