नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या तिघांनी आतम्हत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. या आत्महत्या प्रकरणी अंबड आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. या आत्महत्येत एका अनोळखी तरूणाचा समावेश असून दोन घटना म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत घडल्या आहेत. तिघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. पहिली घटना मानेनगर भागात घडली. दीपक नामदेव गजबे (४२ रा.आमंत्रण रो हाऊस,मानेनगर म्हसरूळ) यांनी शनिवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत दिनकर जाधव यांनी दिलेल्या खबर दिली. दुसरी घटना याच परिसरातील कलानगर भागात घडली. वरून सुर्यभान घुगे (३९ रा.म्हाडा कॉलनी,कलानगर)यांनी शनिवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या बेडरूममधील पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत पवनकुमार दराडे यांनी खबर दिली. दोन्ही घटनांबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास अनुक्रमे हवालदार कुशारे व पोलिस नाईक भोये करीत आहेत. तिसरी घटना औद्यागीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात डोंगरावर घडली. येथे एका अनोळखी २० ते २२ वर्षीय तरूणाने बकानाच्या झाडास नॉयलॉन पट्टी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना एमआायडीसीतील एच लाईन मागील डोंगरावर शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. तरूणाची अद्याप अेळख पटली नसून याबाबत संजय पवार (रा.बजरंगवाडी,विल्होळी) यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत.