नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लॅमरोड भागात रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळय़ातील सुमारे सव्वा लाखाची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिला रमेशचंद्र अग्रवाल (७० रा.साईशांती भवन,लॅमरोड) यांनी तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रवाल या रविवारी सायंकाळच्या सुमारास शेजारी राहणा-याच्या घरी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने त्या पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या मोपेड दुचाकीवरील एकाने त्यांच्या गळयातील वजनी पॅण्डल असलेली सोनसाखळी असा सुमारे १ लाख २५ हजार रूपये किमतीचा ऐवज हिसकावून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.