नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बिटको चौक भागात परिसरात दोन मोटारसायकलींच्या अपघातात जखमी झालेल्या चालकाचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मण दामू मानकर (७८ रा. चाडेगाव,ना.रोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. गेल्या दीड महिन्यांपासून जखमी मानकर यांच्यावर उपचार सुरू होते. २८ ऑक्टोबर रोजी सांयकाळच्या सुमारास नाशिकरोड येथील शिवाजी पुतळया कडून बिटको चौकाच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. अज्ञात मोटारसायकलस्वाराने मानकर यांच्या दुचाकीस कट मारल्याने ते जखमी झाले होते. मुलगा सुनिल मानकर यांनी त्यांना तातडीने गोविंदनगर येथील अॅपेक्स वेलनेस हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलिस नाईक देवरे करीत आहेत.याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.