पार्किंगमध्ये लावलेल्या दोन मोटारसायकली वेगवेगळया भागातून चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागातून नुकत्याच दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे. पहिली घटना कामटवाड्यात घडली. राकेश देविदास नाकवे (रा.विजय सागर अपा.चंपाअरण्ये मिसळ जवळ,कामटवाडे) यांनी तक्रार दाखल केली आहे. नाकवे यांची ड्रिम युगा एमएच १५ ईडब्ल्यू ५७११ मोटारसायकल गेल्या सोमवारी (दि.१९) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत. दुसरी घटना पखालरोड भागात घडली. येथे राहणारे नासीरखान दाऊदखान पठाण (रा.सायरा अपा.पखालरोड) यांची स्प्लेंडर एमएच १५ एजे ७२८८ गेल्या शुक्रवारी (दि.२३) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.
चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राधानगर भागात खिडकीत हात घालून चोरट्यांनी चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. विपूल रमेश बच्छाव (रा.सायली पॅलेस,ड्रिम कॅसेल शेजारी म.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्छाव यांचा सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल त्यांनी आपल्या बेडरूममध्ये चार्जिंगला लावलेला असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बेडरूमच्या उघड्या खिडकीत हात घालून मोबाईल चोरून नेला. ही घटना रविवारी (दि.२५) घडली. अधिक तपास पोलिस नाईक झनकर करीत आहेत.