नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना पाथर्डी गावात घडली. अशपाक हबीब खान पठाण (३० रा.मधुकरनगर) यांनी रविवारी अज्ञात कारणातून दारूच्या नशेत आपल्या राहत्या घरात लोखंडी कडीस ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत बैतूल हबीब खान (रा.भिमवाडी,गंजमाळ) यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत. दुसरी घटना सिडकोतील सह्याद्रीनगर भागात घडली. येथे राहणा-या रूपेश सुरेश भालेराव (२७ रा.टेलिफोन ऑफिस समोर) या युवकाने अज्ञात कारणातून गेल्या मंगळवारी (दि.२०) आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच भाऊ सुरेश भालेराव याने त्यास तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता रविवारी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.