नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्ग बसस्थानक आवारात प्रवासी महिलेच्या बॅगेची चैन उघडून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचा नेकलेस असा सुमारे ३५ हजाराच्या ऐवजावर चोरुन नेला. या चोरीप्रकरणी हिरा रामराव जाधव (रा.नवी मुंबई) यांनी तक्रार दिली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव या नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आल्या होत्या. गेल्या रविवारी (दि.१८) त्या परतीच्या प्रवासासाठी महामार्ग बसस्थानकात गेल्या होत्या. कसारा बसचे तिकीट काढण्यासाठी महामार्ग बसस्थानकातील तिकीट खिडकीजवळ त्या नंबर लावून उभ्या असतांना ही घटना घडली. गर्दीच रागेंत उभ्या असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेची चैन उघडून पाच हजाराची रोकड व नेकलेस असा सुमारे ३५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक गोडे करीत आहेत.