India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

निमाणी बसस्थानकात बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवासी तरूण जखमी

India Darpan by India Darpan
December 24, 2022
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निमाणी बसस्थानकात बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवासी तरूण जखमी झाल्याची घटना घडली. रोहिदास दत्तू उर्फ दत्तात्रेय शिंदे (३० रा.कोणार्क नगर,आडगाव) असे जखमी प्रवाश्याचे नाव आहे. जखमी शिंदे यांच्यावर उपचार सुरू असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात बसचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गुरूवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास घरी जाण्यासाठी निमाणी बसस्थानकात गेले होते. कोणार्क नगर बसची ते प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली. आवारात ते उभे असतांना पार्क केलेल्या सीटी लिंक बस अचानक चालकाने मागे घेतल्याने हा अपघात झाला. बसमागे उभे असतांना चालकाने आपले वाहन मागे घेत पुढे दामटले या घटनेत बसचे चाक शिंदे यांच्या उजव्या पायावरून गेल्याने ते जखमी झाले असून चालक आपल्या वाहनासह पसार झाला आहे. याप्रकरणी शिंदे यांचे भाऊ सचिन शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमएच १५ जीव्ही ७९७४ या बसवरील चालकाविरूध्द अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत.


Previous Post

चक्कर येवून पडल्याने दोन जणांचा शहरातील वेगवेगळ्या भागात मृत्यू

Next Post

प्रवासी महिलेच्या बॅगेची चैन उघडून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचा नेकलेस केला लंपास

Next Post
प्रातिनिधिक फोटो

प्रवासी महिलेच्या बॅगेची चैन उघडून चोरट्यांनी रोकडसह सोन्याचा नेकलेस केला लंपास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group