नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी उपनगर आणि पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना औरंगाबाद नाका भागात घडली. वासूदेव बाबुराव पुजारी (६७ रा.सदगुरू कृपा सोसा.) या वृध्दाने बुधवारी (दि.१४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. मुलगा लोकेश पुजारी यांनी तात्काळ नजीकच्या सदगुरू हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना शुक्रवारी डॉ. कृष्णा यादव यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक मोरे करीत आहेत. दुसरी घटना विहीतगाव येथे घडली. येथील पायल ज्ञानेश्वर खडांगळे (१४ रा.मथुरारोड) या अल्पवयीन मुलीने गुरूवारी (दि.१५) आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच आई कुंता खडांगळे यांनी त्यांना तात्काळ सुविधा क्रिटिकेअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता शुक्रवारी सकाळच्या सुमारास उपचार सुरू असतांना डॉ.विशाल शर्मा यांनी तिला मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.