नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नरफाटा परिसरात रस्ता ओलांडत असतांना भरधाव आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत ७० वर्षीय वृध्दा ठार झाल्याची घटना घडली. काशिबाई मुरलीधर पवार (रा.गोदरेजवाडी,सिन्नरफाटा) असे अपघातात ठार झालेल्या वृध्देचे नाव आहे. काशिबाई पवार या शनिवारी (दि.१०) सिन्नर फाट्याकडून एकलहराकडे जाणारा मार्ग ओलांडत असतांना हा अपघात झाला. नाशिकहून सिन्नरच्या दिशेने भरधाव जाणा-या आयशर ट्रकने (एमएच १५ एच ८२९६) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना बिटको हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना डॉ.दिग्वीजय पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.