नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या तीघांनी बुधवारी गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येत १९ वर्षीय तरूणासह वृध्द आणि एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव,देवळाली कॅम्प आणि अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना देवळाली कॅम्प येथील घडली. गोकुळ सदरदार ग्रोवर (६२ रा.विद्याविनायक सोसा.अलेझिया गार्डन) या वृध्दाने बुधवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या बंगल्याच्या जिन्यातील रिलींगला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत करणसिंग ग्रोवर यांनी दिलेल्या खबरीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गि-हे करीत आहेत. दुसरी घटनेत नांदूरनाका भागात राहणा-या भाग्यश्री सुनिल धुमाळ (५१ रा.निसर्गनगर) या महिलेने अज्ञात कारणातून बुधवारी आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ.राम पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सावंत करीत आहेत. तिसरी घटना सिडकोतील राणाप्रताप चौक भागात घडली. सार्थक राजेंद्र बोडके (१९ रा.साईसमर्थ रो हाऊस,महाले फार्म,लक्ष्मीनगर) या युवकाने अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातीील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. काका संग्राम बोडके यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.