निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसाने सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणेसह परिसराला जोरदार झोडपले. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. अनेकांची शेते कांदा लागवडीसाठी सज्ज असतांना अचानक आलेल्या या पावसाने सर्वत्र शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खरीपाचा काढणी केलेला मकाही या पावसात भिजल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. तर लावणीस आलेली कांदा रोपे या पावसाने भुईसपाट झाली आहेत.
गत दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण त्यातच रब्बी हंगामाची लगबग असतांना अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. मशागत केलेल्या सर्व जमिनी परत 8 ते 10 दिवस थांबून तैयार कराव्या लागणार आहेत. रब्बीच्या पिकांना अनेक बुरशीजन्य रोगांचा सामना करावा लागणार आहे. यातच कांद्याची रोपे लावणीसाठी सज्ज असताना अवकाळी पावसामुळे ही रोपेही वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. पिकून आलेला मका ओला झाल्याने मका ही खराब होऊन मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पुढील 8 ते 10 दिवस शेतात कुठंलेही कामे करता येणार नसल्याने रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम होणार आहे.
Unseasonal Rainfall Agriculture Crop Loss