नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुला जास्त झाले का ? असे बोलून शिवीगाळ करीत मालधक्कारोड भागात घराबाहेर बोलावून घेत ३८ वर्षीय इसमास मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहणाती इसमाचा दात पडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल जितेंद्र जाधव असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी सचिन सखाराम गायकवाड (रा.महात्मा ज्योतीबा फुले नगर,मालधक्कारोड देवळाली गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. गायकवाड गेल्या शनिवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरात असतांना संशयितांने घराबाहेरून आवाज देत त्यांना बोलावून घेतले. यावेळी तुला जास्त झाले का ? असे बोलून संशयिताने शिवीगाळ करीत गायकवाड यांना मारहाण केली. या घटनेत तोंडावर बुक्का मारण्यात आल्याने गायकवाड यांचे दोन दात पडल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.