नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -शहरात वेगवेगळ्या भागातून पिकअपसह चोरट्यांनी दोन मोटारसायकली चोरून नेल्या. याप्रकरणी आडगाव,पंचवटी आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे. मोटारसायकल चोरीची पहिली घटना रामवाडी भागात घडली. जयश्री संदिप वर्मा (रा.त्र्यंबकराज अपा.रामवाडी) यांची यामाहा एमजेआय २७८१ गेल्या सोमवारी (दि.१२) त्यांच्या सोसायटीच्या आवारात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत. तर संकेत संजय मोरे (रा.कमोदपार्क,कमोदनगर) यांची पल्सर एमएच १८ बीएस ५१०७ गेल्या शनिवारी (दि.३) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक हादगे करीत आहेत. दोन मोटरसायकल चोरीबरोबरच घरासमोर पार्क केलेली पिकअपही चोरट्यांनी चोरुन नेली. माडसांगवी येथील सुनिल बबन बर्वे (रा.चारी क्रमांक सहा) यांनी या चोरीप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांची महिंद्रा पिकअप एमएच ०४ जीएफ २५८७ गेल्या सोमवारी (दि.१२) त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सावंत करीत आहेत.